तू phone addicted नाहीस — तू हरवलेला आहेस
तू phone addicted नाहीस.
तू हरवलेला आहेस.
आणि phone हा फक्त तुझी सुटका आहे.
काही दिवसांपूर्वी मी एका 1st year च्या मुलाला भेटलो. तो थकलेला दिसत होता — डोळ्यांखाली काळी वर्तुळं, चेहऱ्यावर एक अजब blankness.
मी विचारलं, “रात्री नीट झोपत नाहीस का?”
तो म्हणाला, “नाही दादा, सवय झाली आहे. रोज 4–5 वाजेपर्यंत जागा असतो.”
“एवढा वेळ काय करतोस?”
तो एक क्षण थांबला. खिडकीबाहेर बघितलं. मग हळूच म्हणाला
“काही नाही… Reels, YouTube.”
मी थेट विचारलं “Guilt नाही वाटत? वेळ वाया जातोय असं?”
तो सरळ डोळ्यात बघत म्हणाला
“वाटतं ना… पण काय करणार दादा? Career clear नाही. पुढे काय करायचं माहीत नाही.
रात्री डोक्यात विचारांचा गोंधळ होतो आणि तो शांत करायला परत phone उचलतो. निदान तेव्हा तरी सगळं बंद होतं.”
मी काही सेकंद काहीच बोललो नाही.
कारण हे फक्त त्या एका मुलाचं नव्हतं.
हे वाचताना तू एक सेकंद थांबलास का?
कारण हे तुझ्या अर्ध्या friend circle चं आहे. कदाचित तुझंही.
विचार कर रात्री तू phone उचलतोस तेव्हा खरंच entertainment हवं असतं का?
की डोक्यातला तो एक uncomfortable प्रश्न “पुढे काय?” तो बंद करायचा असतो?
Scroll करताना तुला entertainment नको असतं.
तुला त्या uncomfortable प्रश्नापासून सुटका हवी असते.
तुझी प्रत्येक रात्र अशी दिसते
रात्र होते → Phone उचलतोस → Scroll सुरू होतो → 2 वाजतात → Guilt येतो → तरी थांबत नाहीस → 4 वाजतात → झोपतोस → सकाळी उठतोस → स्वतःशीच promise करतोस → रात्र होते → पुन्हा तेच
आणि हा loop तुला माहीत आहे. तरीही तुटत नाही.
का?
कारण हा loop तोडायचा असेल तर screen time कमी करणं पुरेसं नाही त्या रात्रीच्या anxiety ला address करणं गरजेचं आहे.
घरचे बघतात , तू phone वर आहेस.
त्यांना वाटतं तू चुकतोयस.
पण त्यांना माहीत नाही की तू आतून drain होतोयस , रोज थोडा थोडा.
आणि phone हे symptom आहे, problem नाही.
सगळे एकच सांगतात ,
“Screen time कमी कर, phone खाली ठेव.”
हे ऐकून कंटाळा येतो ना?
कारण सांगणारे कधीच विचारत नाहीत , तू scroll का करतोयस?
उत्तर साधं आहे.
Brain ला “void” सहन होत नाही.
जेव्हा career unclear असतो, interest माहीत नसतो, पुढे काय हे blank असतं
तेव्हा brain सगळ्यात सोपं आणि painless काम निवडतो.
Scroll.
रात्री जागणं म्हणजे laziness नाही.
ती anxiety आहे ज्याला योग्य outlet मिळालेलं नाही.
आणि phone तो outlet बनतो temporarily. दर रात्री.
एकदा स्वतःशी honest होऊन check कर —
✦ रात्री 1–2 नंतरही scroll करतोस, सकाळी regret होतो , पण रात्री थांबत नाहीस
✦ घरचे “काय करतोयस?” विचारतात , तू “अभ्यास” सांगतोस
✦ मित्रांना internship, project करताना बघतोस ,envy येतो, पण start होत नाही
✦ career बद्दल बोलायला सांगितलं की topic बदलतोस
✦ बरेच motivation videos बघतोस , पण एकही गोष्ट implement नाही झाली
✦ तुला माहीत आहे वेळ जातोय , तरी थांबता येत नाही
एकही point hit झाला का?
जर हो , थांब.
हे तू “bad person” आहेस म्हणून नाही.
हे तू lost आहेस म्हणून आहे.
आणि lost असणं fix होतं.
तुला motivation कमी नाही ,
तुला clarity नाही.
हा फरक आयुष्य बदलतो.
Motivation म्हणजे “कर, कर, कर” असं ओरडणं , ते 2 दिवस टिकतं.
Clarity म्हणजे “का करायचं आहे” हे आतून माहीत असणं , ते आयुष्यभर टिकतं.
त्या मुलाला मी शेवटी एकच गोष्ट सांगितली ,
“आज रात्री phone उचलण्याआधी एक मिनिट थांब.
कागद घे. एकच प्रश्न लिही ,
5 वर्षांनी मी कशात असेन तर मला खरंच proud वाटेल?”
उत्तर माहीत नसलं तरी चालेल. फक्त लिही.
तुझ्यासाठी हेच तीन steps आहेत
Step 1 → आज रात्री तो एक प्रश्न कागदावर लिही. (Mobile वर नाही — कागदावर)
Step 2 → उद्या सकाळी तो कागद परत वाच. उत्तर आलं नसलं तरी चालेल — प्रश्न डोक्यात राहू दे.
Step 3 → थोडी clarity आली की एका माणसाशी बोल — मित्र, mentor, कोणीही. एकट्याने carry करू नकोस.
Clarity मिळाली की phone आपोआप खाली ठेवशील.
Direction मिळालं की रात्री जागण्याचं कारण उरणार नाही.
मी Pratik Parad आहे.
मला technology फक्त शिकायला नाही, तर ती तरुणांच्या आयुष्यात खरा बदल घडवू शकते का , हे समजून घ्यायला नेहमीच आवडलंय.
शिकताना, प्रयोग करताना, चुका करताना एक गोष्ट स्पष्ट झाली ,
बहुतेक तरुण technology consume करतात, पण त्याचा उपयोग करून career आणि आयुष्य build करायला कोणी शिकवत नाही.
आणि हा gap बंद करण्यासाठी TechMenta सुरू केलं.
जे questions तुला कोणाला विचारता येत नाहीत , career, direction, future बद्दल
ते इथे विचार.
Marathi मध्ये. Without judgment.
TechMenta Community
जिथे lost नाही direction मिळतं.
आमच्या community मध्ये असे students आहेत जे तुझ्यासारखेच होते ,confused, unclear, रात्री जागणारे.
आज ते build करत आहेत , स्वतःचं काहीतरी.
Career questions, real conversations, actual direction — Marathi मध्ये.
Free आहे. Judgment नाही.
👇 WhatsApp Community Join करा



Comments
Post a Comment